केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली -केरळ येथील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आज एेतिहासिक निर्णय याबाबत एक एेतिहासिक निर्णय दिला आहे.  केरळ मधील 10 ते 50 वर्षाच्या महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. ती बंदी आता उठविण्यात आली असून महिलांना केरळच्या शबरीमालात प्रवेश करण्यासा परवानगी मिळाली आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज सुनावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती आर एफ नरीमन, न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं निर्णय दिला आहे. 5 पैकी 4 सदस्यांनी निर्णय दिला. पाचही सदस्यीय खंडपीठानं वेगवेगळे निर्णय दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठान म्हटलं आहे की, महिला या पुरूषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जात आहेत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाही. महिलांना मंदिरात जाण्याापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्वांचे उल्लंघन ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी लिंगावरून भेदभाव करणं योग्य नाही, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

महिलांना प्रवेशबंदी का होती..

शबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)