आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा झटका : जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूला आज सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर आहे. सुरत येथील न्यायालयाने आसारामचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर लैंगिक शोषणप्रकरणात आसाराम बापूची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे .

दरम्यान या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आसाराम बापूने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला दिलासा न देता त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये आसारामबापूला इंदूर येथील आश्रमातून अटक करण्यात आली होती. आसारामचा मुलगा नारायण साईवरही बलात्काराचे आरोप आहेत त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)