न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. याची सुरूवात ही सर्वोच्च न्यायालयातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल पण यासाठी नियमाचं पालन करण्यात येईल अस सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ति एम एम खानविलकर आणि न्यायमूर्ति  डी वाई चन्द्रचूड याच्या खंडपीठाने 24 आॅगस्ट रोजी या मुद्दयावर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. खंडपीठाचे म्हणणे होतं की, ते न्यायालयातील गर्दी कमी करण्यासाठी खुले न्यायालयची परिकल्पना लागू करू इच्छित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाने आज निर्णय देताना म्हटलं आहे की, न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केल्याने न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल आणि हाच खुले न्यायालयाचा योग्य सिध्दांत असेल. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)