राफेलबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला !

नवी दिल्ली: राफेलबाबतचा कॅगचा अहवाल सादर करताना सरकारकडून चूक झाली. या अहवालातील तीन पाने गायब झालेली आहेत. ही तीन पाने आम्हाला रेकॉर्डवर आणायची आहेत, असे नमूद करत अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आज केंद्र सरकारच्या विशेषाधिकाराचा मुद्दा जोरकसपणे सर्वोच्च न्यायालयात मांडला.

राफेल व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांबाबत केंद्र सरकारने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर आगोदर सुनावणी केली जाईल आणि त्यानंतर या व्यवहाराच्या फेरविचारासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.या कागदपत्रांची चोरी होणे आणि त्याची फोटो कॉपी काढली जाणे हे देशहितासाठी बाधक असल्याची भूमिका सरकारने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

-Ads-

राफेलबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला होता

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)