चिटफंड घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले

नवी दिल्ली – चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने खात्रीलायक पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी, कोलकाता शहर पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना धक्‍का दिला होता. पण त्याचवेळी त्यांना अटक करता येणार नाही, असे सांगत दिलासाही दिला होता.

चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेवून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पश्‍चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)