मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस 

नवी दिल्ली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांना नोटीस बजावली असून या प्रकरणात स्वतःची बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा समावेश केला नाही, असा आरोप याचिकाकर्ते सतीश उके यांनी केला आहे. यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आल्याने  फडणवीस यांची निवड रद्द करावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी फडणवीसांना मोठा दिलासा दिला होता. परंतु, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नागपूरमध्ये मानहानीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी निवडणूक प्रतिज्ञापत्रात न माहिती दिल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)