मशिदीत नमाज पठण करण्यासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली – मशिदीत नमाज पठण करणे हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही यावर सुप्रीम कोर्ट 27 सप्टेंबररोजी निकाल देऊ शकते. हे प्रकरण संविधानिक खंडपीठाकडे हस्तांतरित केले जावे की नाही, याबाबत सुप्रीम कोर्ट सांगणार आहे.

1994 मधील इस्माईल फारुकी खटल्यातसंदर्भातील निकाल हा मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्याची आवश्यकता आहे की नाही हा निकाल सुप्रीम कोर्टाने 20 जुलै रोजी राखून ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान अयोध्या मंदिराच्या वादासंदर्भात 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच 1994 मधील इस्माईल फारुकी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मशिदीत नमाज पठण इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निकाल दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)