पुलवामा प्रकरणी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 

नवी दिल्ली – पुलवाम अयेथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे व्यापक कारस्थान असल्याची शक्‍यता गृहित धरून तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वकील विनीत धांदा यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.

“सीआरपीएफ’च्या जवानांची बस उडवून देण्यासाठी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून सुमारे 370 किलो “आरडीएक्‍स’चा वापर केल गेला होता. म्हणूनच यामागे व्यापक कारस्थान गृहित धरून तपास करण्यात यावा, अशी मागणी या जनहित याचिकेत केली गेली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पिठाने ही याचिका फेटाळून लावली. मात्र पुलवामा आणि उरी हल्ल्यांसंदर्भात भारतीय नागरिकांची भूमिका तपासून बघण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. 2016 साली झालेल्या उरी हल्ल्यात 17 जवान शहिद झाले होते. त्याच्या तपासात त्रुटी आढळल्या असल्या तरी व्यापक तपास झालेला नव्हता. म्हणून स्थानिक काश्‍मिरींकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सहकार्य केले गेले असल्याचा तपास होणे आवश्‍यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)