या जन्मावर या जगण्यावर…

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळीतच शंभरी गाठल्याचे वचन घेतले जाते. मग आयुष्य खुप सुंदर आहे. अशी बरीच वचने घेणारे शब्द या संदर्भातील आपण ऐकतो मृत्यूचे स्वागत करा, अशी अपेक्षा कुणीच करणार नाही पण जगण्यालाही मृत्यूचा शाप असतो.

कृतार्थतेने आयुष्याच्या संध्याकाळी याची देही याची डोळा मोक्ष मिळावा ही अपेक्षा तर दुसरीकडे शारिरीक यातना असह्य झाल्यामुळे पत्कारलेली शरणागती तर नव्हे, अजून काही राहिलं तर नाही नां ही हुरहूर करणारा विचार या मृत्यूला कवेत घेणाऱ्या क्षणी काय बळ देईल असे अनेक विचार येवून जातात.

सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाचा मार्ग मोकळा केला खरे पण तो योग्य की अयोग्य की केवळ एक विकल्प हाही विचार. इच्छा मरणावर अनेक वर्षे वेगवेगळी मत्यांतरे, मंथन झालेले दिसते पण यात नुकतेच “जगण्याच्या सन्मानाचा हक्क’ हे पुस्तक वाचण्यात आले इच्छा मरण खरेच योग्य का? यात प्रत्येक व्यक्तीने सन्मानानेच आयुष्याचे मार्गक्रमण केले नसेल, कुणाला आर्थिक विंवचना मृत्यूला झुंज देण्याच्या बाबतीत अडथळा वाटत असतील तर कुणाला एकाकीपणाचा कंटाळा आला असेल, तर कोणाला कृतार्थता वाटून बस्‌ ही भावना येवून मृत्यूला सामोरे जाण्याची ओढ म्हणजे इच्छा मरण हवे असेल पण विज्ञान युगात अशा विचारांना जवळ करणे थोडे नकारात्मकच वाटते, जैविक, वैज्ञानिक तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली असताना इच्छामरण किंवा दयामरण स्विकारणे कितपत योग्य, शेवटी पुन्हा व्यक्तीसापेक्षता आहेचं. फक्त न्यायालयाने त्यावर आपली मोहर चिकटवली अन्‌ इच्छामरणाचा मार्ग खुला केला. अनेक स्वतंत्र अधिकाराबरोबरचं इच्छा मरणाचे स्वातंत्र्य ही या लोकशाहीत शक्य. झाले माणूूस संपूर्ण स्वतंत्र खऱ्या अर्थाने झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण पुढे याच जन्म-मृत्यूच्या फेऱ्याचा विचार अध्यात्माच्या दृष्टीने केला तर जन्माची चाहूल आपल्याला कळते पण मृत्यूचे येणे आकस्मिक असते. यातील नवलाई, आश्चर्यही संपली का असा विचार आला. सगळयाच शक्यता आपण आपल्याच हातात घेत तर नाही ना! मग एक शक्ती जिने “विश्व’ संकल्पना पूर्ण होते. त्याचे काय? कदाचित सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर ज्याने जन्माचे मूळ दिले तो, नंतर विज्ञान संशोधनाचा शोध लावणारा “तो शास्त्रज्ञ’ ज्याने मृत्यूलाही जिंकले परमेश्वराचेच एक रूप असेल असा विचारही येवून जातो. शेवटी “मातीतून जन्मले मातीतच मिसळले’ हा प्राकृत सिध्दांत “इच्छामरण’ या निर्णयानेही शाश्वतच राहील कारण तत्व नेहमी चिरंतन राहतात.

इच्छामरण सामाजिक राजकारणीय भाषेत वेगळे संदर्भ देईल तर विज्ञान अध्यात्म पातळीवर ही संकल्पना जगण्याचा सन्मानच करेल. इच्छामरण मृत्यूलाही सन्मानित करेल इतकाच मध्य साधता येईल, निर्णय विचाराधीन, स्वागतार्ह, नक्कीच पण पुन्हा एकदा केवळ आत्मसुखाचाच विचार करणारा इच्छामरणाचा निर्णय ठरेल.

मग वृध्दाश्रमाप्रमाणेच अशी इच्छा व्यक्ता करणाऱ्या कृर्ताथ ज्येष्ठांसाठी आपलं अस हक्काच घर निरोपांच्या क्षणांची वाट बघणारी संकल्पना हे घर रूजवेल जिथे शेवटच्या क्षणी आपल्या सारख्या इच्छामरणाच्या भावना व्यक्त करणारी जागा मिळेल. ही संकल्पना रूजू लागेल असाही विचार आला.

इच्छामरण योग्य की अयोग्य या मुद्याला अजून पैलू आहेत हे उलगडायला हवेत. ही सकारात्मक संकल्पना रूजवणे त्या विधात्याच्या भाकीताला सार्थ करेल त्यात मानवी मनाला उभारी येण्याचे बळ मिळेल. इच्छामरण, स्वेच्छामरण, दयामरण या शब्दांचे अर्थ अजून उलगडायला हवेत सामान्यजनापर्यंत. कायदा मनाला ओळखत नाहीत असे म्हणतात हे या निर्णयात उलट बोलावे लागेल, “कायद्यानेही या निर्णयात मनाचाच विचार केला.’ अशा इच्छामरणाचे स्वागत सन्मानाने जगलेल्यांना आपले कोणाला ओझे वाटू नये मृत्यूलाही सन्मानाने सामोरे जाता यावे अशी मुभा देवून मृत्यूलाही जिंकण्याचे समाधान या इच्छामरणांने मिळेल का??

– मधुरा पायगुडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)