राफेल कराराच्या किंमतीची माहिती द्या : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: राफेल कराराबाबत दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल कराराच्या किंमतीबाबत तसेच अनिल अंबानी यांच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित कंपनीला भागीदार म्हणून नेमण्याच्या निर्णयाबाबत सखोल माहिती देण्यासाठी विचारणा केली.

यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती गोपनीय असल्याने जाहीर करता येणार नाही असे उत्तर दिले असता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल कराराबाबतची माहिती गोपनीय असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र १० दिवसांच्या आत सादर करण्याचा आदेश दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणावर मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने राफेल लढाऊ विमानांच्या किंमती व उपयुक्तेबाबत भाष्य करणार नसल्याचं म्हंटल होत मात्र आजच्या सुनावणीमध्ये चीफ जस्टीस ऑफ इंडिया रंजन गोगाई यांनी “राफेल कराराच्या किंमतीबाबत तसेच अनिल अंबानी यांच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित कंपनीला भागीदार म्हणून नेमण्याच्या निर्णयाबाबत सखोल माहिती १० दिवसांमध्ये न्यायालयासमोर सादर करण्याची विचारणा सरकारी पक्षाकडे केली.”

यावर सरकारी वकिलांनी सरकारची बाजू मांडताना “ही माहिती गोपनीय असल्याने जाहीर करता येणार नाही तसेच मागील सरकारने देखील राफेल कराराची किंमत जाहीर केली नव्हती” असे सांगितले.

“ही माहिती जाहीर करता येत नसल्यास तसे लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर १० दिवसांच्या आत सादर करावे” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)