सुप्रीम कोर्टाने दिली साक्षीदार संरक्षण योजनेला मंजुरी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी जी योजना सर्वोच्च न्यायालयाला सादर केली आहे त्या योजनेला कोर्टाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला कायद्याचे स्वरूप मिळेपर्यंत सर्व राज्यांनी या योजनेचीच अंमलबजावणी करावी अशी सुचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्या. ए. के. सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या योजनेत काही बदलही केले आहेत.

आसारामबापुवरील बलात्काराच्या खटल्यात त्यातील साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या संबंधात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्यावेळी साक्षीदारांचे संरक्षण हा विषय ऐरणीवर आला होता.19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी बोलताना ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की साक्षीदारांच्या संरक्षणाच्या संबंधात आम्ही जो कायदा करणार आहोत त्याचा मसुदा तयार आहे पण संसदेत त्यावर मतदान होईपर्यंत हीच योजना सर्व राज्यांनी अंमलात आणण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती.

-Ads-

नॅशनल लीगल सर्व्हिस ऍथॉरिटीशी चर्चा करून या प्रस्तावाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. राज्यांकडून यावर सुचना मागवून त्यात आवश्‍यक ते बदल करण्यासही न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)