तेरा पोलीस अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या

डॉ. प्रवीण मुंढेंच्या बदलीस स्थगिती

पुणे – पोलीस दलातील 13 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांची धुळे येथे पोलीस अधीक्षकपदी केलेल्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. तर, वाशिम येथे अपर पोलीस अधीक्षक असलेल्या स्वप्ना गोरे यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

-Ads-

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव (कंसामध्ये कोठून, कोठे बदली झाली)
बसवराज तेली (पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, वर्धा), दीपक साकोरे (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), पंकज डहाणे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस उपायुक्त, नवी मुंबई), सी. के. मीना (पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक लोहमार्ग, औरंगाबाद), निर्मला देवी (पोलीस उपायुक्त मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उपायुक्त, नागपूर शहर), निसार तांबोळी (पोलीस अधीक्षक वर्धा (बदली आदेशाधीन) उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), निकेश खाटमोडे (पोलीस उपायुक्त मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर), सुनील भारद्वाज (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला (बदली आदेशाधीन) ते सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, मुंबई), प्रशांत कदम (अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), संजय सुरगौडा पाटील (अपर पोलीस अधिक्षक, हिंगोली (बदली आदेशाधीन) ते अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण), लता फड (अपर पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद, विश्‍वास पांढरे (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते पोलीस अधीक्षक, धुळे ).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)