ऍक्शन सिनेमांचे बादशाह रोहित शेट्टीने आपल्या सुपरकॉप सिरीजमध्ये आता आणखी एक नाव जोडणार आहे. आपल्या नवीन सिनेमासाठी रोहित शेट्टीने शिर्षकाचे रजिस्ट्रेशनदेखील करून टाकले आहे. त्याच्या या आगामी सिनेमाचे नाव “आया पुलिस’ असणार आहे. याची खासियत म्हणजे पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये फिमेल ऍक्टरला स्थान देण्यात आले आहे. हा लीड रोल दीपिका पदुकोणला दिला गेला आहे, असे देखील समजते आहे. रोहितच्या बरोबर पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमधील दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.
रोहित शेट्टीने यापूर्वी पोलिस नायक असलेले अनेक सिनेमे केले आहेत. रणबीर सिंह आणि सारा अली खानचा “सिंबा’ हा त्याचा या सिरीजमधील सर्वात अलिकडचा सिनेमा होता. “सिंबा’ रिलीज होतानाच रोहितने अक्षय कुमारला घेऊन “सूर्यवंशी’ची घोषणा रोहित शेट्टीने केली. “आया पुलिस’चे शुटिंग सुरू होण्यापूर्वी रोहितने इन्स्टाग्रामवर अजय देवगण, रणबीर आणि अक्षयच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. सुपर कॉप सिरीजमधील हे तिघेही हिरो रोहितच्या नवीन सिनेमात छोटा रोल करण्याचा अंदाज वर्तवला जायला लागला होता. “सिंबा’मधील “आला रे आला सिंबा’ या गाण्यात “आया पुलिस’ असे शब्द आहेत. त्यावरूनच रोहितला नवीन सिनेमाचे शिर्षक सुचले.