सुपर स्पेशालिटी परीक्षेत डॉ. झिरपे देशात प्रथम

नवी दिल्ली - येथे डॉ. दिनेश झिरपे यांना गौरवितांना स्वास्थ व कुटूंबकल्याण राज्यमंत्री अश्विन कुमार चोबे व इतर मान्यवर.

शेवगाव  – नवीदिल्ली येथील राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने सन 2016 मध्ये घेतलेल्या डी. एन. बी सुपर स्पेशालिटी परीक्षेत सर्जिकल गॅंस्ट्रो एंटरॉलॉजी लिव्हीर ट्रान्सफर या विषयात शेवगावचे भुमिपूत्र डॉ.दिनेश कुंडलिक झिरपे यांनी देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना डॉ. एन. रंगाबशाम सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या 19 व्या दिक्षांत समारंभात दिल्लीच्या विज्ञान भवनात उपराष्ट्रपती एम. व्यकंय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थित केंद्रीय स्वास्थ व कुटूंबकल्याण राज्यमंत्री अश्विन कुमार चोबे यांच्या हस्ते डॉ. दिनेश यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. डॉ. दिनेश हे एम.बी.बी.एस, एम.एस, डी.एन.बी असून या परिक्षांमध्येही त्यांनी प्राविण्य मिळविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2016 च्या सर्जिकल गॅंस्ट्रो एंटरॉलॉजी लिव्हीर ट्रान्सफर या विषयात ते देशात पहिले आले असून सध्या पुणे येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहेत. डॉ. दिनेश हे येथील स्टेट बॅंकेचे निवृत्त अधिकारी कुंडलिक झिरपे यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)