बॉलिवुडमधील “सुपर सेल्फी’ व्हायरल 

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या विवाहसोहळ्यास बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थितीमुळे आकाश-श्‍लोका यांच्या पार्टीची रंगतच वाढली होती.

या पार्टी सर्वच स्टार स्टाइलिश लुकमध्ये दिसत होते. यावेळी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने एक कार्यक्रम रद्‌द करून पार्टीत सहभागी झाली होती. पार्टी अटेंड केल्यानंतर सर्वजण एकमेकांना भेटत होते. त्यावेळी या सर्व स्टार्स कलाकारांनी एकत्रित सेल्फीही काढला. चित्रपट लेखक आणि फोटोग्राफर मुश्‍ताक शेख यांनी हा “सुपर सेल्फी’ आपल्या इंस्टाग्राम हॅडलवर शेअर केला.

या सुपर सेल्फीमध्ये प्रियांका चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस, हुमा कुरैशी, साकिब सलीम, तब्बू, सुशांत सिंह राजपूत, जावी कपूर आणि ईशान खट्टरसह अनेक कलाकार आहेत. याशिवाय प्रियांका चोप्राने सेल्फीसह अन्य कलाकारांसोबतचे वेगवेगळे सेल्फी घेतली. बॉलीवूडमधील ही “सुपर सेल्फी’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्याला लाईकस्‌ केले असून काही जणांनी फनी कॉमेंटस्‌ही दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)