“सुपर 30′ या शिक्षण संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्यावर आधारीत “सुपर 30′ सिनेमाला बिहार सरकारने करमुक्त केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री सुशिल कुमार मोदी यांनी याबाबतची घोषणा केली.18 जुलैपासून “सुपर 30′ बिहारमध्ये करमुक्त होईल, असे सुशिल मोदी यांनी सांगितले.
सिनेमाचे केंद्रबिंदू असलेले आनंद कुमार यांनी या निर्णयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशिल मोदी यांना धन्यवाद् दिले आहेत. आनंद कुमार यांच्या बायोपिकला आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. रिलीज झाल्याच्या पहिल्या पाच दिवसात सिनेमाने एकंदर 53 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. त्यात रविवारच्या एकाच दिवशी 18 कोटी रुपयांचा धंदा झाला होता. हृतिक रोशनला प्रथमच गरिब आणि प्रामाणिक शिक्षकाच्या रोलमध्ये बघण्याचा वेगळाच अनुभव प्रेक्षकांना मिळाला आहे. या रोलमध्ये तो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याचे बिहारी ढंगातले बोलणे अगदी अस्सल वाटत असल्याची प्रतिक्रिया पब्लिककडून मिळते आहे.
आनंद कुमार यांच्या बायोपिकच्या निमित्ताने बिहारची पडद्यावरची इमेज उजळली आहे. “सुपर 30’मध्ये गरिब विद्यार्थ्यांना “आयआयटी’च्या प्रवेशासाठीचे गणित मोफत शिकवणाऱ्या आनंद कुमार यांची धडपड दर्शवण्यात अली आहे.