RCB vs SRH : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लाजीरवाणा पराभव

हैदराबाद – आयपीएलच्या बाराव्या मोसमात आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलमधील 11 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 118 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना जाॅनी बेयर्सटोच्या 56 चेडूंत 114 आणि डेविड वार्नरच्या 55 चेंडूत नाबाद 100 धावांच्या जोरावर 20 षटकांत 2 बाद 231 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद 113 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (3), एबी.डी.विलियर्स (1), शिमरोन हेट्मेयर (9) आणि पार्थिव पटेल (11) धावां काढून तंबूत परतले. राजस्थानकडून गोलंदाजीत मोहम्मद नबीने 4 तर संदीप शर्माने 3 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)