हैदराबाद – आयपीएलमधील 38 वा क्रिकेट सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये हैदराबाद येथे थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा सनरायजर्स हैदराबादच्या बाजूने लागला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
Match 38. Sunrisers Hyderabad win the toss and elect to field https://t.co/MQutZvfBKH #SRHvKKR #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019
गुणतालिकेत दोन्ही संघांचे प्रत्येकी 8-8 गुण असून हैदराबाद आपली विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाताला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोलकाता नाईट रायडर्स –
क्रिस लिन, सुनील नारेन, शुबमन गिल, रिंकु सिंह, नितीश राणा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पियूष चावला, के सी करियप्पा, हेरी गर्नी, पृथ्वी राज
सनरायजर्स हैदराबाद –
डेविड वार्नर, जॉनी बेयर्सटो, केन विलियमसन, विजय शंकर, दीपक हुड्डा, यूसुफ पठान, राशिद ख़ान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, खलील अहमद