#IPL2019 : हैदराबाद आणि पंजाब समोरासमोर; दोन्ही संघांना आज विजय अनिवार्य

सनरायजर्स हैदराबाद Vs किंग्ज इलेव्हन पंजाब

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – राजीव गांधी क्रीडा मैदान, हैदराबाद

हैदराबाद – आयपीएलच्या बाराव्या मोसमाची बाद फेरी गाठण्यास उत्सूक असणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यान आजचा सामना होणार असून बाद फेरीत जागा मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना आज विजय मिळवणे अनिवार्य आहे.

यंदाच्या मोसमात सर्वात समतोल समजल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्य संघाला चांगल्या कामगिरीनंतरही विजय मिळवण्यात अपयश आल्याने त्यांचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न आजच्या सामन्यातील विजयावर अवलंबून असणार आहे. हैदराबादच्या संघाने यंदाच्या मोसमात 11 सामन्यांमधील पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांचे दहा गुण झाले आहेत.

सध्या जरी ते क्रमवारीत चौथ्या स्थानी असले तरी त्यांना आज पराभवाचा सामना करावा लागल्यास ते पाचव्या स्थानी फेकल्या जावू शकतात आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे. त्याच बरोबर हैदराबादच्या संघातील धडाकेबाज सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो मायदेशी परतला असून दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हा यंदाच्या मोसमातील अखेरचा सामना ठरणार असून या सामन्यात विजय मिळवून तो संघाचा निरोप घेण्यास प्रयत्नशील असेल. त्याच बरोबर वॉर्नर परतल्यानंतर संघाला आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता निर्माण झाली असून आजच्या सामन्यात विजय मिळवून हैदराबादचा संघ बाद फेरी गाठण्यास उत्सूक असेल.

तर, दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासमोर बाद फेरी गाठण्याची ही अखेरची संधी असून आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते त्यामुळे आज ते विजय मिळवण्याच्या इर्शेनेच मैदानात उतरतील. दरम्यान पंजाबने यंदाच्या मोसमात आकरा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)