सनी लिओनच्या बायोपिकच्या सीझन 3 शुटिंग पूर्ण

सनी लिओनच्या आयुष्यावर आधारीत वेबसिरीज “करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी’च्या सीझन 3 चे शुटिंग पूर्ण झाले आहे. सनीने इन्स्टाग्रामवर याचा ट्रेलर शेअर केला आहे. सीझन 3 चा प्रिमिअर 5 एप्रिलला होणार आहे. सीझन 2 मध्ये सनीच्या आयुष्यातील इतर उतार चढाव दाखवले जाणार आहेत. भारतातील रिऍलिटी शो मध्ये सहभागी होणे, पालकांचे निधन आणि डॅनिएलबरोबरच्या लग्नासारख्या महत्वाच्या घटनांवरही प्रकाश टाकला जाणार आहे.

सनीच्या या बायोपिकमध्ये सनी लिओनचा रोल खुद्द सनी लिओनच साकारणार आहे. याशिवाय तिच्यासाठी लिहीलेल्या रोलमागील सत्य, स्क्रीप्ट लिहून झाल्यावर तिला त्यानुसार स्वतःला तयार करताना येणाऱ्या अडचणी, पोर्न स्टार म्हणून इतिहास असल्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळवताना आलेल्या अडचणी या सगळ्या गोष्टींचाही उहापोह होणार आहे. सीझन 1 मध्ये 10 एपिसोड होते, तर सीझन 2 मध्ये 6 एपिसोड होते. पण आता या सीझन 2 मध्ये किती एपिसोड असणार आहेत, हे अद्याप समजलेले नाही. हिंदी आणि इंग्लिशमध्ये एकाचवेळी डबिंग पूर्ण करून हा सीझन 3 रिलीज होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)