गुरदासपूरमध्ये सनी देओलचा ‘ढाई किलो का हात’ काँग्रेसवर भारी पडण्याची चिन्ह

पंजाब – पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा काँग्रेसचे येथील विद्यमान खासदार सुनील जाखर आणि भाजप उमेदवार तथा सिनेअभिनेता सनी देओल यांच्यामध्ये दुहेरी लढत होती. गुरदासपूर हा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचे दिवंगत नेते तथा फिल्मी अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये येथून काँग्रेसच्या सुनील जाखर यांनी विजय संपादित केला होता.

दरम्यान, सध्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरु असून निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार येथून सनी देओलने आघाडी घेतली आहे. सनीच्या खात्यामध्ये आतापर्यंत ५०३८४२ मतं जमा झाली असून त्याच्या खालोखाल काँग्रेसच्या विजय जाखर यांना ४१९,१३१ एवढी मतं मिळाली आहेत. सध्या तरी गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल हाच आघाडीवर असल्याचं चित्र आहे मात्र संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)