सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील पक्ष कार्यालयात सुनील तटकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असून रायगड लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आहेत. पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्ह्हा अध्यक्ष नाझीम हासवरे यांनी या धमकी विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुनील तटकरे यांना आलेली धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, वडगाव तांदळी, जिल्ह्हा अहमदनगर या व्यक्तीची मदत घेऊन सुनील तटकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या पत्रातील व्यक्तीला शोधून त्वरित कारवाई करावी असे म्हंटले आहे. धमकीचे अशाप्रकारे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)