सचिन तेंडुलकरने अनोख्या पध्दतीने दिल्या सुनिल शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

बाॅलिवूड मध्ये आपली वेगळी अोळख निर्माण करणारा सुनिल शेट्टी आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनिल शेट्टी याला अभिनया सोबतच क्रिकेटची देखील आवड आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याला क्रिकेटर व्हायचे होते.

क्रिकेटची त्याची आवड लपून राहिलेली नाही. त्याने अनेकदा भारतीय संघाला प्रोत्साहान देण्यासाठी महत्वाच्या क्रिकेट सामन्यावेळी स्टेडियमवर हजेरी लावलेली आहे. आज एका ठिकाणी अचानकपणे वाढदिवसादिवशी सुनिल शेट्टीची भेट भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्याशी झाली.

-Ads-

त्यावेळी त्याने सचिनसोबत एक सेल्फी फोटो घेतला. हाच फोटो नंतर सचिनने आपल्या आॅफिशिअल अकाउंटवर शेअर करत सुनिल शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यासोबत सुनिल शेट्टीने काढलेल्या फोटोची प्रंशसा देखील केली.  या फोटोला दोघांच्याही चाहत्यांकडून चांगलीच पंसती मिळत आहे. तसेच सुनिल शेट्टीचे चाहते देखील त्याला शुभेच्छा देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)