लोकेश राहुलला संघातून वगळा – सुनील गावसकर

अ‍ॅडलेड – भारताचे महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी सतत अपयशी ठरत असलेला सलामीवीर लोकेश राहुल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये देखील लवकर बाद झाल्याने त्याच्यावर टीका करत त्याला भारतीय संघातून वगळायला हवे असे सांगितले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतच्या पहिल्या डावात लोकेश राहुल 2 धावा करून बाद झाला होता. त्याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, राहुल जर दुसर्या डावात लवकर बाद झाला तर त्याला भारतीय संघातून वगळायला हवे. त्याच्या फलंदाजीकडे पहिल्यावर त्याच्यातील आत्मविश्वास संपल्याचे दिसत आहे. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूंना खेळताना तो चाचपडत आहे. कोणता चेंडू खेळावा आणि कोणता नाही याचा तो योग्य अंदाज बांधू शकत नाही. चेंडूच्या लयीत न येता तो बाहेरूनच त्यांना डिवचतो आहे. त्याच्या तंत्रातीळ काही चुका त्याला भोवत आहेत.

-Ads-

पुढे बोलताना गावसकर म्हणाले, तो लेगस्टंम्पवरून फलंदाजी करताना पुढे येतो आहे त्यामुळे अचूक अंदाज येत नाही. त्याची उंची जास्त असल्याने त्याप्रकारे पुढे सरसावत जर त्याने खेळ केला तर चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो आणि स्लिपमधे बाद होतो. त्यामुळे त्याला आपल्या तंत्रात बदल करण्यासाठी वेळ द्यायला हवा. त्याने अश्‍याच प्रकारची चूक इंग्लंड दौऱ्यात केली होती आणि त्याची पुनराव्रुती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत करत आहे. असेही, गावसकर म्हणाले.

या मोसमात लोकेश राहुलने भारतीय संघासाठी सर्वाधिक 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 23. 44च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. यात एक मोठी शतकी खेळी आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे.

अफगाणिस्थान विरुद्धच्या बेंगलोर येथे खेळल्या एकमेव कसोटीमध्ये त्याने अर्धशतक झळकाविले होते तर इंग्लंड दौऱ्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 149 धावांची खेळी केली होती. अन्य 19 डावात फक्त सहा वेळा 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये स्थान मिळण्याची शक्‍यता नव्हती. परंतु, नवोदित सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला सराव सामन्यात दुखावत झाल्याने त्याची संघात वर्णी लागली.

गावसकर यांच्या अगोदर भारतीय संघाचे मुख्य फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी देखील लोकेश राहुलवर टीका केली होती. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकवेम सराव सामन्याच्या पहिल्या डावात लवकर बाद झाल्यावर संजय बांगर टीका करताना म्हणाले होते की, राहुलच्या फलंदाजीकडे आणि त्याच्या बाद होण्याच्या शैलीकडे पाहताना तो बाद होण्याचे नवीन मार्ग शोधात आहे. असे ते म्हणाले होते. परंतु, दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली आणि पृथ्वी शॉ जायबंदी झाल्याने त्याची पहिल्या कसोटीसाठी निवड झाली.

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)