क्रिकेटची परतफेड करणे अवघड – सुनील गावस्कर

पुणे – भारतीय क्रिकेटला चंदू बोर्डे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना बघून क्रिकेट खेळायला लागलो. क्रिकेटने आम्हांला आयुष्यात इतके दिले आहे कि, त्याची परतफेड करणे अवघड आहे, अशी भावना भारताचे माजी कर्णधार व लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी चंदु बोर्डे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना येथे व्यक्त केली.

भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या पॅंथर्स पेसेस या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी कर्णधार व लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नल ललित राय, लेखक मोहन सिन्हा, पूना क्‍लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील आणि अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना सुनील गावस्कर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले कि, माझ्या पिढीला चंदू बोर्डे, टायगर पतौडी यांसारख्या दिग्गजांना बघून क्रिकेट शिकायला मिळाले. मी पहिल्यांदा चंदू बोर्डेंना 1958 साली इंडिया-वेस्ट इंडिज दरम्यान ब्रे बॉर्न स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात बघितले होते. त्यावेळेस ब्रे बॉर्न स्टेडियमच्या पिचवर चेंडूला भरपूर उसळी मिळायची आणि वेस्ट इंडिजच्या आक्रमक गोलंदाजांविरुद्ध दिग्गज खेळाडू बघताना उत्कृष्ट अनुभव असायचा.

फक्त खेळाडू म्हणूनच नव्हे तर, व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य अतुलनीय आहे.बोर्डे सर हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर एक जिवंत उदाहरण आहे. यांसारख्या दिग्गजांच्या वारस्यामुळेच आम्ही क्रिकेट खेळायला लागलो.

यावेळी चंदू बोर्डे म्हणाले कि, वयाच्या 16व्या वर्षापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी आता सारखे प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे आम्ही दिग्गजांना खेळताना पाहूनच शिकायचो. मी माझे भाग्य समजतो कि, मला अनेक दिगगजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली.

सुनील गावस्कर हे भारताच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट सलामीच्या फलंदाजांपैकी एक असून त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करणे हे माझे भाग्य आहे. या पुस्तकाला प्रस्तावना वेस्ट इंडिजचे दिगग्ज गॅरी सोबर्स यांनी लिहिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदन लेले यांनी केले. या पुस्तकामध्ये चंदू बोर्डे यांच्या विविध भूमिकांचा तब्बल 6 दशकांचाअनुभव प्रतिबिंबीत झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)