शहरात उकाडा वाढला

तापमानात अचानक वाढ


विदर्भात मात्र होणार मुसळधार, गारपीट

पुणे – गेले दोन दिवसापासून कमाल तापमानात घट होत असताना आज शहरातील तापमानात अचानक वाढ होऊन ते 37 अंशापर्यत पोहचले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा पाच अंशाने अधिक होते. या वाढत्या तापमानामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता असताना कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र तापमान कोरडे राहणार आहे. कोरड्या तापमानामुळे या भागातील तापमानाचा पारा वाढला आहे. आज पुणे शहरातील कमाल तापमान हे सरासरी पेक्षा पाच अंशाने अधिक होते तर किमान तापमान ही 14 अंश सेल्सियस पर्यत पोहचले होते. गेले दोन ते तीन दिवसापूर्वी असणारी थंडी आता गायब झाली आहे. शहरात चांगलाच उकाडा जाणवू लागला आहे. सकाळच्या हवेतील गारवा कमी झाल्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. संध्याकाळी सुद्धा हा उकाडा जाणवत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात येत्या चोवीस तासात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुरुवारी सुद्धा उकाडा राहणार आहे. हवेतील बदलामुळे मात्र विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट व सोसाट्यांच्या वाऱ्यसह गारपीट होण्याची शक्‍यता सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)