महाराष्ट्रातील चर्चेच्या ठरलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले असून येथून काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव ताठ भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या सुजय विखे-पाटील यांनी विजयी आघाडी मिळवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी विजयी आघाडी घेतली असून त्यांना ४८७८७३ एवढी मतं मिळाली आहेत. सुजय विखे-पाटील यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांना २९७०१८ एवढी मतं मिळाली आहेत. .