ठरलं तर मग! नगरमध्ये ‘सुजय’ विरुद्ध ‘संग्राम’

नगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. प्रकाश गजभिये,  प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला भैया की काका हा घोळ मिटाला असून आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उमेदवार निश्‍चितेचे गुऱ्हाळ सुरू होते. आठ दिवसापूर्वी आ. जगताप पिता-पुत्राचे नाव चर्चेत आहे. आ. अरूण जगताप कि आ. संग्राम जगताप हा घोळ सुरू होता. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यपातळीवरील नेत्यांनी युवक म्हणून आ. संग्राम यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तर आ. संग्राम यांनी त्याचे पिता आ. अरूण जगताप यांच्या नावाचा आग्रह धरला. अर्थात आ.अरूण हेच लोकसभेसाठी इच्छुक आहे. प्रतिस्पर्धी भाजपचा उमेदवार डॉ.सुजय विखे हे युवक असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार युवक असा म्हणून आ. संग्राम यांचे नाव लावू धरण्यात आले होते. परंतू आ. अरूण जगताप यांचा विरोध होता. कारण आ. संग्राम हे विद्यमान नगर शहराचे आमदार आहे. त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर शहरात पक्षांतर्गत विरोधकांचा आमदारकीसाठी दावा होवू शकतो. ती त्यांना मिळू नये म्हणून आ.संग्राम यांनी लोकसभेची उमेदवारी करू नये म्हणून त्यांचा प्रयत्न होता. पिता-पुत्रातील निर्णयामुळे राष्ट्रवादीला दोन दिवस उमेदवार जाहीर करण्यास ताटकळत राहवे लागले होते.

https://www.facebook.com/MLAsangramjagtap/videos/1625653617538422/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)