तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी – भोसरी येथे एका अनोळखी तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. शुक्रवारी (दि. 10) या तरुणाची ओळख पटली असून त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

राजेश्वर पाटील (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजेश्वर बेरोजगार असून, तो सध्या येथे त्याच्या मोठ्या भावाकडे राहत होता. राजेश्वर गेल्या कित्येक दिवसांपासून तणावाखाली होता. या नैराश्‍यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप राजेश्वरचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी केला आहे. मात्र भोसरी पेलिसांनी अधिकृतरित्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)