साहित्य अकादमी विजेत्या लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर टीका केल्याचा आरोप

गोवाहटी: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसामी लेखक हिरेन गोहेन यांच्यासह अन्य दोघांच्यावर आसाम पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात टिप्पणी केल्याच्या आरोपावरून गोहेन यांच्या व्यतिरिक्‍त माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई आणि ज्येष्ठ पत्रकार मनजीत महंत यांच्या विरोधात पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी “नागरिक समाज’ या संघटनेच्या एका कार्यक्रमादरम्यान या तिघांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर टीकात्मक टिप्पणी केली होती. या विधेयकाविरोधात आसाममध्ये सार्वत्रिक नाराजी आहे. परिस्थितीतील असंतोष पाहता प्रशासनाने गोवाहटी शहराच्या काही भागांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधेयकावर जाहीर टीकात्मक वक्‍तव्य केल्याबद्दल गोहेन, गोगोई आणि महंत यांच्याविरोधात पोलिसांनी देशद्रोह आणि गुन्हेगारी कारस्थान कायद्याच्या विविध कलमांखाली स्वतःहून गुन्हा नोंदवून घेतला आहे, असे गोवाहटी पोलिस आयुक्‍त दीपक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्याविरोधात देशाविरोधात युद्ध पुकारणे, सरकारविरोधात बंडाच्या विविध कलमांखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)