काबुल मध्ये सरकारी कार्यालयावर आत्मघाती हल्ला ; 43 ठार

संग्रहित छायाचित्र

काबुल: अफगाणिस्तानच्या काबुल शहरातील एका सरकारी कार्यालयाच्या कम्पाऊंडवर आत्मघाती पथकातील गनिमांनी केलेल्या हल्ल्यात 43 जण ठार तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. काबुल शहरात यंदाच्या वर्षात झालेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. कोणत्याही गटाने या हल्ल्याची अद्याप अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.
ज्या सरकारी कार्यालयाच्या परिसरात हा हल्ला करण्यात आला तेथे सार्वजनिक स्वरूपाची कामे, निवृत्तीवेतन विषयक कामे आणि माजी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनेचे कार्यालय आहे.

सोमवारी दुपारी बंदुकधारी दहशतवादी तेथे घुसले आणि त्यांनी तेथे अंदाधुंद गोळीबार करीत कारबॉंबचा स्फोट घडवून आणला. त्यामुळे तेथे आलेल्या नागरीकांची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पळापळ सुरू झाली. अनेकांनी कार्यालयाच्या कम्पाऊंडच्या भिंतीवर चढून बाहेर उड्या मारल्या त्या प्रयत्नांतही अनेक जण जखमी झाले. शेकडो जण कार्यालयाच्या इमारतीतच अनेक तास अडकून पडले होते. एकूण चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरक्षा जवानांनी त्यांचा खात्मा केल्यानंतरच तेथे अडकलेल्या नागरीकांची सुटका होऊ शकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहशतवाद्यांचा युद्धभूमीवर पराभव झाल्यानेच त्यांनी आता नागरी भागात हल्ले सुरू केले आहेत त्याद्वारे त्यांनी पराभव मान्य केल्या सारखीच स्थिती आहे अशी प्रतिक्रीया अश्रफ घनी सरकारने दिली आहे. तालिबाननेच हा हल्ला केल्याचा दावा सरकारने केला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्यानंतर तालिबानला संपवण्याचा आमचा निर्धार आणखी मजबूत होत असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)