सुहास वारके कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक

मुंबई  – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची बदली आता नाशिकला झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असल्याने नवे आयुक्त म्हणून नांगरे-पाटील यांची निवड झाली आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक एफ. के. पाटील यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. सुनील रामानंद यांची मुंबईच्या पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)