शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार सुहाना?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही आपल्या वडीलांच्या पावलावर पाउल ठेवत अभिनय क्षेत्रात आपले नशिब आजमावू पाहत आहे. सध्या ती आपले शिक्षण पूर्ण करत असून कॉलेजमधील महोत्सवातून ती अभिनयाचे धडे गिरवीत आहे. यातील शुटिंग करत असल्याचे सुहानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

सुहानाने काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयातील एका नाट्य स्पर्धेत भाग घेत ज्यूलियटची भूमिका साकारली होती. या भूमिकेत ती खूपच सुंदर दिसत होती. आता सुहानाचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ती अभिनय साकारताना दिसत आहे. तिच्यासोबत क्रू आणि संपूर्ण कॅमेरा सेटअपही होता. यावरून सुहाना कॉलेजमधील कोणत्यातरी शॉर्ट फिल्मची शूटिंग करत असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सुहानाने यापूर्वीच बॉलीवूडमध्ये करिअर करायचे असल्याचे सांगितले आहे. परंतु, शाहरुखने सध्या तिा या इंडस्ट्रीत येण्यास नकार दिला आहे. त्याला वाटते की, त्याच्या मुलांनी आता शिक्षण पूर्ण करावे आणि त्यानंतरच पुढील आयुष्यात काय करायचे, हे निश्‍चत ठरवावे. त्यामुळे सुहाना बॉलीवूडमध्ये केव्हा पदार्पण करतेय याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)