जूलियट भूमिकेतील सुहानाचा फोटो व्हायरल

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने ऑगस्ट महिन्यात वोग मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यातून तिच्या नस-नसमध्ये अभिनय असल्याचे दिसून येत आहे. सध्या सुहाना लंडन येथे शिक्षण घेत असून कॉलेजमध्ये असताना “रोमियो-जुलियट’मध्ये तिने जूलियटची भूमिका साकारली होती. या भूमिकेतील तिच्या फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोतील कर्ली केसांची सुहाना खूपच गॉरजस दिसत आहे. जी एलिझाबेथ ऍराची आठवण करून देते. याशिवाय व्हाईट शोल्डर फ्लेयर्ड स्लीव्स ड्रेसमध्ये सुहाना आणि तिचा कॉलेजमधील सहकलाकार आहे. या नाटकावेळी खुद्‌द शाहरुख खान आपल्या मुलीला चिअर करण्यासाठी ऑडियन्ससोबत उपस्थित होता. त्यानेही आपल्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा फोटो पोस्ट करत शाहरुखने लिहिले की, आपल्या जूलियटसोबत लंडनमध्ये आहे. हा परफॉर्मेंस खूपच शानदार आणि अद्‌भूत होत. संपूर्ण टीमचे अभिनंदन. दरम्यान, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बोनी कपूर आणि श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूरसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)