खंबाटकी घाटात साखरेचा ट्रक पलटी

लाखो रुपयांच्या साखरेसह ट्रकचे नुकसान

भुईंज –ग्वाल्हेर बंगळुरू आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवर गुरुवारी साखरेने भरलेला ट्रक पलटी झाला. या अपघातात मालासह ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साताराबाजूकडून आर. जे. 19 जी.डी 5229 या क्रमांकाचा माल ट्रक पुणे बाजूकडे साखरेची पोती घेऊन जात असताना सकाळच्या दरम्यान, एस कॉर्नरवर पोहचल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने तो पलटी झाला. त्यात भरलेली साखरेची पोती रस्त्यावर विखुरल्याने सुसाट जाणारी वाहतूक त्यामुळे खोळंबली होती.

खंडाळा तालुक्‍यातील एस कॉर्नरला राज्यातील व देशातील अनेक वाहनांना उचल आपट करून वाहनातील असंख्य प्रवाशांचा बळी घेऊन देशाच्या आणि राज्याच्या ग्रहविभागाच्या पटलावर खंडाळा तालुक्‍यातील हा एस कॉर्नर रेडकॉर्नर आणि मृत्यूचा सापाळा म्हणून नावारूपाला आला, तरी देखील अशा या भयानक जीवघेण्या एस कॉर्नरची कीर्तीचा पाढा राज्यातील आणि देशातील खासदार, आमदारांनी लोकसभेत किंवा राज्यसभेत या एस कॉर्नरला सरळ रस्त्याचे नियोजन करावे, असा एकही प्रश्‍न मांडलेला दिसत नसल्याने वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या एस कॉर्नरवर आजपर्यंत बहुसंख्य प्रवाशांनी आपले प्राण गमावले असून अनेकजण कायमचे अपंग होऊन अंथरुणाशी खिळले आहेत. त्यामुळे एस कॉर्नरवरील नागमोडी असणारी वळणे काढून तो सरळ करावा, अशी मागणी अशी मागणी जोर धरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)