‘सोमेश्‍वर’ कारखान्याकडे साडेतीन लाख क्विंटल साखर शिल्लक 

सव्वालाखांचा बफर स्टॉक : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती 

सोमेश्‍वरनगर – सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याकडे सुमारे 3 लाख 50 हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. त्यातील 1 लाख 21 हजार क्विंटलचा बफर स्टॉक शिल्लक आहे. तसेच सोमवारी (दि. 22) परतीच्या ठेवीवरचे व्याज आणि अंतिम दरातील प्रतिटन 108 रूपये याप्रमाणे 25 कोटी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, या गळीत हंगामाला येत्या दोन दिवसांत सुरूवात होत असून सोमेश्‍वरकडून 10 ते 11 लाख मे. टन उसाचे गाळप केले जाईल. यंदा पावसाने अपेक्षित साथ दिली नाही. सोमेश्‍वर साखर कारखान्याकडे सुमारे 29 हजार 500 एकर उसाची नोंद झाली होती; परंतु पाण्यामुळे काही विशेष जिरायत भागातील शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. आमच्या अंदाजाने 12 लाख मे. टन उसाचे गाळप होईल असा आमचा सुरूवातीला अंदाज होता; परंतु उपलब्ध पाण्याचा अंदाज त्याचबरोबर हुमणीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव त्याचाही परिणाम होणार आहे. तरीदेखील सोमेश्‍वर कारखाना 11 लाख मे. टन गाळप करेल यात कोणतीही अडचण येणार नाही. हंगामासाठी आवश्‍यक ती सर्व पूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, कारखान्याच्या परिसरात बीड, उस्मानाबाद, जलना, अहमदनगर, पाथर्डी, गेवराई, पाटोदा आदी जिल्हा तालुक्‍यांच्या परिसरातून हजारो मजूर दाखल झाले आहेत. या मजूरांना कारखान्याकडून राहण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय, चटई, बांबू, वीज आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकी अधिकारी बाबूराव गायकवाड यांनी दिली तसेच ऊसतोड मजूरांच्या स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमेश्‍वर कारखाना कार्यक्षेत्रात आशा प्रकल्प राबवला जातो. तसेच आशा प्रकल्पातील कार्यकर्ते मजूर कुटूंबाचे सर्वेक्षण करणे. त्यातून शालेय मुले शोधणे व त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करणे या कामाला लागले आहेत. सहा महिन्यांसाठी त्यांना याच भागातील सरकारी शाळांमध्ये दाखल करून शिक्षण देणार असल्याचे शिक्षक मार्गदर्शक अनिल चाचर यांनी सांगितले.

 

यंदा सर्वत्रच पाऊस कमी असल्याने पेरण्या झल्या नाहीत त्यामुळे ऊसतोडणी मजूराचा पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या परिसरात व कारखाना कार्यक्षेत्राजवळ पाणी बऱ्यापैकी आहे म्हणून आम्ही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटवण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून करार केले असून आमचे सर्व ऊसतोडणी मजूर कारखाना परिसरात दाखल झाले आहेत. 

-संतोष पिसाळ, ऊसतोडणी कामगार 

 

ऊसतोड मजूर दाखल 

सोमेश्‍वर कारखान्यावर मराठवाडा, विदर्भातून 400 ते 500 मैल प्रवास करून ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. झोपड्या उभ्या करण्याची त्यांची लगबग सुरू आहे. दोन दिवसांत सोमेश्‍वर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सहा महिन्यांसाठी मजूर येथे राहणार असून आरोग्य , निवारा व शिक्षण या प्रश्‍नांशी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)