‘ज्ञानेश्वर कारखाना’ देणार प्रतिटन 200 रुपये- डॉ. घुले

संग्रहित छायाचित्र

नेवासे – ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्यास मागील सन 2017 – 18 गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 200 रुपये प्रमाणे पेमेंट वर्ग करणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील व उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

डॉ. घुले पाटील म्हणाले, मागील सन 2017 – 18 च्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्याने गाळप केलेल्या सर्व ऊसाचे प्रतिटन 2 हजार 100 रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.

नुकत्याच झालेल्या कारखाना संचालक मंडळाचे सभेत शेतकऱ्यांना अधिकचे प्रतिटन 200 रुपये पेमेंट लवकरच अदा करून प्रतिटन 2 हजार 300 रुपये दर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)