साखर आयुक्तालयाची उद्या आढावा बैठक

पुणे – राज्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही उसाचे क्षेत्र वाढणार असून साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या हंगामात होणाऱ्या उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी साखर आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात राज्यातील यंदाच्या गाळप हंगामाबाबत चर्चा होणार आहे. त्यामध्ये हंगामासाठी लागणाऱ्या पूर्वहंगामी कर्जाची आवश्‍यकता आणि उपलब्धता, ऊस तोडणी अणि वाहतूक यंत्रणेची उभारणी व त्याबाबत झालेले करार, कारखान्यांनी यंत्रसामग्री दुरुस्ती व देखभालीबाबत आढावा घेणे, शेतकऱ्यांना देण्यात येणारी एफआरपी रक्कमेबाबतसुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी अवसायनात गेलेल्या कारखान्यांबाबत चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)