सुदीरमन स्पर्धेला आजपासून प्रारंभ
नैनिंग (चीन) – आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याकडून रविवारपासून (दि. 18) सुरू होणा-या सुदीरमन बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पदकांची आशा आहे. या स्पर्धेत भारताने 2011 आणि 2017मध्ये उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले होते. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना चीनचा कडव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना सोमवारी मलेशियाच्या खेळाडूंशी होणार आहे. त्यानंतर पुढील सामना 10 वेळच्या विजेत्या चीनशी होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघात 13 खेळाडूंचा समावेश असून भारताला आठवे मानांकन मिळाले आहे. भारतीय संघात पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा या आघाडीच्या खेळाडूंसह अन्य जणांचा समावेश आहे.