महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर पिसे यांची निवड

पुणे: महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. सुधीर पिसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. असोसिएशनची निवडणूक मुंबई येथे पार पडली. सदर सभेसाठी संलग्न 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी राजेश पंजाबी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक म्हणून जयकुमार नटराजन उपस्थित होते.

असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सी.पी. गुप्ता, सुनील साकळ, महमंद चाऊस, पार्थ जोशी, धनंजय वनमाळी, शिवाजी पाटील, तर सचिवपदी संजय नाईक यांची निवड झाली आहे. ऍड. सुधीर पिसे सन 1985 ते 1995 या कालावधीत महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष होते तर 1995 ते 2004 या कालावधीत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते महाराष्ट्र राज्य नामदेव शिंपी समाजाचे सन 2000 पासून अध्यक्ष आहेत. आतापर्यंत राज्य शिंपी समाजाची चार अधिवेशने त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)