रेडिओलॉजिस्टच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध- सुधीर मुनगंटीवार

शिर्डी : रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह बैठक आयोजित करुन सकारात्मक मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.

शिर्डी येथे रेडिओलॉजिस्ट इमेजिंग असोसिएशनच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.के.मोहनन, डॉ.अमरनाथ, डॉ.रवी आलुलवार, डॉ.अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ.गिरीष महिंद्रकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्यातील काही तरतुदीमुळे निरपराध डॉक्टरांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यासह बैठक आयोजित करुन, योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देतांनाच रेडिओलॉजिच्या एकूण प्रक्रियेत महिला तज्ज्ञांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)