आशियाई स्पर्धा २०१८ : स्टीपलचेस स्पर्धेत सुधा सिंगला रौप्यपदक

जकार्ता –  इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानंतर आज अॅथलेटिक्सकडे सर्वांचे लक्ष्य होते. अॅथलेटिक्समधून चांगली बातमी आली आहे.

भारताची युवा धावपटू सुधा सिंग हिने आज भारताला रौप्यपदक पटकावून दिले आहे. स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत दुसरे स्थान पटकाविले. तिने 3000 मी. अंतरासाठी 9 मिनिटे 40 सेकंदाची वेळ नोंदवली. तिचे सुवर्णपदक हे केवळ चार सेकंदांनी हुकले. सुवर्णपदक पटकावणाऱ्या बेहरिनच्या यावी विनफ्रेडने 9 मिनिटे 36 सेकंदाची वेळ नोंदविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी 2010 साली आशियाई स्पर्धेत सुधाने सुवर्णपदक पटकाविले होते. मात्र मागील कामगिरी कायम राखण्यात तिला अपयश आल्याने यावेळच्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)