प्रेरणा : सुचिताताईंचे व्यापक मातृत्व!   

दत्तात्रय आंबुलकर 

स्त्री ही आदी शक्‍तीचे रूप असते. तिच्यामध्ये अफाट ऊर्जा-शक्‍ती व त्याबरोबरच वात्सल्य पण असते. परमेश्‍वराने स्त्रीला सहनशीलतेचे जे देवदत्त वरदान दिले आहे त्यामुळे स्त्री जीवनातील विविध जटील समस्या आणि आव्हानांवर लीलया मात करू शकते.

याच शक्‍तीपूर्ण वात्सल्याचे प्रत्यंतर 19 नोव्हेंबर 1998 रोजी अकोल्याच्या सुचिता बनसोड यांना मुलगा झाला. साऱ्या घरात आनंदी वातावरण पसरले. वंशाला दिवा मिळाल्याचा आनंद सर्वदूर पसरला. मात्र, या आनंदाला अल्पावधीतच शंका-कुशंकांनी पुरतेपणी गाठले.

दोन महिन्याच्या आपल्या मुलाला खेळविताना सुचिताताईंना जाणवू लागले की त्यांचे बाळ त्यांच्या लडिवाळ खेळविण्याला अपेक्षित प्रतिसाद देत नाही. याचे कारण शोधले असता त्यांना आपल्या तान्ह्या बाळाच्या श्रवणशक्‍तीत कमतरता वा दोष तर नाही अशी सुरुवातीला शंका आली व ही शंका अल्पावधीतच खरी पण ठरली. त्यामुळे चिंतायुक्‍त सुचिताताईंचा आनंद तर हरवलाच व शिवाय त्यांचे आयुष्य पण बदलून गेले. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःला सांभाळले व मुलावर आवश्‍यक ते सारे उपचार करण्याचा निर्धार करून त्यानुसार प्रयत्न सुरू केले.

आपल्या श्रवणदोष असणाऱ्या मुलावर अकोल्यात आवश्‍यक ते उपचार होऊ शकत नाहीत याची अल्पावधीतच जाणीव झाल्याने सुचिताताईंनी त्याच्या पुढील उपचारांसाठी थेट मुंबई गाठली. त्यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी सोडण्यास पण मागे-पुढे पाहिले नाही. अनेकवेळा अकोल्याहून मुंबईच्या फेऱ्या केल्या. मात्र, त्यांनी आपले जिद्दी प्रयत्न सोडले नाहीत.
आधी शिक्षिका म्हणून बी.एडचे प्रशिक्षण घेणाऱ्या सुचिताताईंनी अमेरिकेच्या ट्रेनिंग क्‍लिनिक या संस्थेचा दिव्यांगजन व कर्णबधिरांच्या उपचारावरचे प्रशिक्षण मोठ्या प्रयत्नाने पूर्ण करून आपल्या मुलासह इतर कर्णबधिर मुलांवर पण उपचार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सुचिताताईंच्या बाळ निखिलेशवर मुंबईत यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांच्या श्रवणशक्‍तीमध्ये लक्षणीय स्वरूपात सुधारणा झाली.

यामुळे सर्वाधिक आनंद तर झालाच मात्र त्यांनी आपल्या मुलाच्या निमित्ताने सुरू केलेले कर्णबधिरांच्या शिक्षण-सुधारणेचे प्रयत्न कायम ठेवले व त्यासाठी दिव्यांगजन पुर्वसनविषयक विशेष शिक्षण पण घेऊन अशा गरजू मुलांच्या शिक्षण-विकास कामालाच सर्वस्वी वाहून घेतले. याकामी त्यांना त्यांच्या शिक्षिका म्हणून केलेल्या कामाचा अनुभव कामी आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)