सुचेता कृपलानी

कॉंग्रेसच्या नेत्या असलेल्या सुचेता कृपलानी तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्या. 1952 साली त्या किसान मजदूर प्रजा पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत विजयी ठरल्या.

1957 मध्ये त्यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवली व नवी दिल्लीमध्ये त्या विजयी ठरल्या. त्यांनी केंद्र सरकारमध्ये लघुउद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. 1963 साली कृपलानी उत्तर प्रदेशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्याचबरोबर स्वातंत्र्यसेनानींसोबत विधानसभेत निवडल्या गेलेल्या काही महिलांमध्ये सुचेता कृपलानीही होत्या. शिवाय भारताचे संविधान तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या काही उप-समित्यांमध्येही सुचेता कृपलानी होत्या. चौथ्या लोकसभा निवडणुकीत त्या गोंडा येथून विजयी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)