नवी दिल्ली – भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांचा एका महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेवर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणाचाही मुलगा असो त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे नाव न घेता मोदींनी सुनावले.
मोदी म्हणाले कि, कोणात्याही नेत्याच्या मुलाचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यांनाही पक्षात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्या सर्वांना पक्षातून बाहेर काढायला हवे, अशा कडक शब्दात त्यांनी सांगितले.
दरम्यान, इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी सुरूवातीस महापालिका अधिकारी व आकाश विजयवर्गीय यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आकाश यांनी बॅट घेऊन अधिकाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आकाश यांच्या समर्थकांनी इंदुरमध्ये त्यांच्या सर्मथनार्थ पोस्टर लावण्यास सुरुवात केली होती.