दोन अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची आज यशस्वी चाचणी

बालासोर, (ओडिशा): संपूर्ण भारतीय बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या “क्‍वीक रिऍक्‍शन सर्फेस टू एअर मिसाईल्स’ या दोन अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. एकाचवेळी एकापेक्षा अधिक लक्ष्य भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये असणार आहे. रडारच्या सहाय्याने ही क्षेपणास्त्रे आपले लक्ष्य स्वतःच शोधून काढू शकतील आणि त्याचा अचूक वेधही घेऊ शकतील.

ओडिशातील चंडिपूर येथील चाचणी केंद्रातून ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, असे “डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वेगवेगळ्या उंचीसाठी आणि वेगवेगळ्या वातावरणात या क्षेपणास्त्रांचा उपयोग केला जाऊ शकणार आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 30 किलोमीटर पर्यंत असणार आहे. भारतीय लष्करासाठी “डिआरडिओ’ने विकसित केलेली ही तिसरी क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्रांची प्रथम चाचणी 4 जून 2017 रोजी घेण्यात आली. तर 14 जुलै 2018 रोजी अखेरची चाचणी घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी या यशस्वी चाचण्यांसाठी “डीआरडीओ’चे अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)