डायनामाईट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण

माधव विद्वांस

आज 14 जुलै. तब्बल 151 वर्षांपूर्वी विख्यात स्वीडिश शास्त्रज्ञ सर आल्फ्रेड नोबेल यांनी ‘डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले. त्यानंतर युद्ध तसेच खुदाई कामाचे पद्धतीत मोठी क्रांती झाली. त्यांना युद्धसामग्रीच्या शोधामध्ये 355 पेटंट मिळाली होती. त्यांचे वडील शेती अवजारे, खाणीसाठी लागणारे सुरूंग यांची निर्मितीचा व्यवसाय करीत.

आल्फ्रेड नोबेल यांना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले होते. पण ते तिथे फक्‍त एकच वर्ष राहिले व आपल्या पित्याच्या कारखान्यात स्फोटकांचा अभ्यास करू लागले. दिनांक 3 डिसेंबर 1964 साली त्यांचे कारखान्यात मोठा स्फोट झाला व त्यातच त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर नाइट्रोग्लिसरिनवर ते जास्त संशोधन करू लागले व त्यावर त्यातील स्फोटक द्रव्यावर नियंत्रण करून सुरक्षित स्फोटके मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातूनच कॉर्डाइटची (cordite) निर्मिती झाली. त्याचा युद्धामध्ये वापर होऊ लागला. तसेच खाणकामातही उपयोग होऊ लागला डायनामाईट, जिलेटिन आणि क्षेपणास्त्रे या गोष्टींचेही ते जनक मानले जातात. यातून त्यांना प्रचंड धन मिळाले.

ते “बोफोर्स’ या तोफा बनविणारी कंपनीचे सन 1894 मध्ये प्रमुख झाले (ही मूळ कंपनी 1646 पासून अस्तित्वात होती). अनेक वृत्तपत्रांनी “मौत का सौदागर’ म्हणून नोबेल यांची अवहेलना केली. लढाईमधे पूर्वीपेक्षा अधिक लोकांना मारण्यासाठी मार्ग शोधून श्रीमंत झालेला म्हणून नाचक्कीही झाली. क्षेपणास्त्रे इटलीला विकण्यावरून फ्रान्सविरुद्ध उच्च देशद्रोही आरोप झाल्यावर ते इटलीला निघून गेले. तेथे अल्फ्रेड नोबेल एखाद्या विचित्र हृदयरोगास बळी पडले, त्याला पक्षाघात सहन करावा लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंब व मित्रांनाही ही गोष्ट कळली नव्हती.

त्यांना त्यांनी लावलेल्या संशोधनाचा युद्धात मानवी संहारासाठी होत असलेला वापर पाहून खूप क्‍लेश झाले. त्यांनी विवाह केला नव्हता. मिळालेल्या प्रचंड संपत्तीचे वापरासाठी त्यांनी ट्रस्ट केला होता. ह्याच ट्रस्टमार्फत दिला जाणारा नोबेल पुरस्कार जागतिक प्रतिष्ठेचा झाला. सन 1901 या वर्षीपासून हे पुरस्कार देणेस सुरुवात झाली. भौतिक, रसायन, शरीरविज्ञान, आदर्शवादी साहित्य व विश्‍वशांती अशा पाच विषयांसाठी हे पुरस्कार सुरुवातीस दिले गेले व त्यानंतर त्यात वाढ झाली. बोफोर्स कंपनीच्या हॉव्हित्झर तोफ़ांनीच 1989 साली भारतात राजकीय स्फोट घडवून आणला व व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. याच तोफांनी कारगिल युद्धात आपला चांगला प्रभाव दाखवून दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)