बंगळुरू : भारताच्या जीसॅट 31 या दूरसंचार उपग्रहाचे आज फ्रेंच गयाना येथून अंतरीक्षात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. दक्षिण अमेरिकेच्या कौरोऊ संकुलातून आज मध्यरात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार 2 वाजून 31 मिनीटांनी या उपग्रहाचे अंतरीक्षात यशस्वी प्रक्षेपण झाले.
केवळ 42 मिनीटांच्या प्रवासानंतर हा उपग्रह अंतरीक्षातील आपल्या नियोजित कक्षेत स्थिरावला. चालू 2019 वर्षातील इस्त्रोची ही तिसरी यशस्वी अंतरीक्ष मोहीम आहे. याबद्दल इस्त्रोच्या सतीश धवन अंतरीक्ष केंद्राचे संचालक एस पंडियन यांनी सांगितले. 2535 किलो वजनाचा हा उपग्रह अंतरीक्षात सतत कार्यरत राहील. त्याचे आयुष्य किमान पंधरा वर्षांचे आहे. भारतातर्फे अवकाशात सोडण्यात आलेला हा चाळीसावा दूरसंचार उपग्रह आहे.
या उपग्रहाची ट्रॉन्स्पॉंडर क्षमता शक्तीशाली कु बॅंडची आहे. टेलिव्हीजन अपलिंकींग, डिजीटल सॅटेलाईट न्युज गॅदरींग, डीटीएच टेलिव्हीजन सर्व्हिस आणि सेल्युलर कनेक्टीव्हीटीसाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा