“इस्रो’च्या भू-निरीक्षण उपग्रहासह 30 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने, पीएसएलव्ही-सी 43 अवकाशयानाद्वारे आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.

पीएसएलव्ही-सी 43, ठीक 9 वाजून 57 मिनिटे आणि 30 सेकंदांनी लॉन्चपॅड वरून अवकाशात झेपावला आणि अवघ्या 17 मिनिटांत भारताचा हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग हा भू निरीक्षण उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावला. त्या पाठोपाठ 30 परदेशी उपग्रहे देखील अवकाशात झेपावून त्यांच्या भूस्थिर कक्षेत स्थिरावले. शेवटचा उपग्रह साधारण साडे बारा वाजता आपल्या कक्षेत सोडण्यात आला. या उपग्रहाचे नियंत्रण इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग विभागाकडे असून येत्या काही दिवसांत हा उपग्रह कार्यरत होईल. हायसिस योग्य प्रकारे कार्य करत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सुरेश के यांनी दिली आहे.

इस्रोच्याच आयएमएस-2 या लघु उयपग्रहांभोवती फिरणारा हायसिस हा भू-निरीक्षण उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या उपग्रहाने संकलित केलेली माहिती, कृषी, वन, भौगोलिक पर्यावरण, किनारी प्रदेश आणि अंतर्गत जलाशये यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासोबत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, मलेशिया आणि स्पेन या देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी आपल्या सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहातील अनेक भाग भारतात बनवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उपग्रहामुळे भूभागावरील विविध क्षेत्रांची अचूक माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

येत्या डिसेंबर महिन्यात इस्रो दोन मोठ्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे, जी सॅट- 11 फ्रेंच गुआना इथून तर जी सॅट- 7 ए श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित केला जाईल, असे सिवन यांनी सांगितले. यापैकी जी-सॅट 11 हा इस्रोचा आजवरचा सर्वाधिक वजनदार उपग्रह असेल, असेही त्यांनी सांगितले. 2019 साली इस्रो चांद्रयान-2 सह साधारण 12 ते 14 उपग्रह अवकाशात सोडेल,असेही सिवन यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)