अनुदानित गॅस सिलिंडर 5 रूपये 91 पैशांनी स्वस्त

file pic

नववर्षाची भेट: विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120 रूपयांची कपात

नवी दिल्ली: सार्वजनिक इंधन कंपन्यांनी ग्राहकांना नववर्षाची भेट देताना स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 5 रूपये 91 पैशांची कपात केली. याशिवाय, विनाअनुदानित सिलिंडर 120 रूपये 50 पैशांनी स्वस्त झाला. नवे दर 1 जानेवारीपासून लागू करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कमी झालेल्या बाजारमुल्यावरील कराच्या परिणामस्वरूप महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा गॅस (एलपीजी) स्वस्त झाला. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो वजनी अनुदानित सिलिंडर 494 रूपये 99 पैशांना मिळेल. आधी दिल्लीत सिलिंडरचा दर 500 रूपये 90 पैसे इतका होता.

याआधी 1 डिसेंबरला अनुदानित सिलिंडरच्या दरात 6 रूपये 52 पैशांची कपात करण्यात आली होती. त्याआधी जूनपासून सलग सहा महिने अनुदानित सिलिंडर महागला होता. दरातील दोन कपातींमुळे सहा महिन्यांत झालेली 14 रूपये 13 पैशांची वाढ जवळपास भरून निघाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरात झालेली घसरण आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाचे वधारलेले मूल्य आदींमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, 1 डिसेंबरला विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 133 रूपयांची कपात करण्यात आली होती. ताज्या कपातीमुळे दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडर (14.2 किलो वजनी) 689 रूपयांना मिळेल. केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी 12 अनुदानित सिलिंडर पुरवले जातात. ग्राहकाला बाजारमुल्यानुसारच सिलिंडर खरेदी करावा लागतो.

अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. अनुदानाची रक्कम दर महिन्याला बदलत असते. ती एलपीजीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि परकी विनिमय दरावर अवलंबून असते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सिलिंडरवर अनुक्रमे 433.66 रूपये आणि 308.60 रूपये अनुदान देण्यात आले. जानेवारीसाठी ते 194.01 रूपये इतके असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)